शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

"केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व...", रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 2:13 PM

bjp atul bhatkhalkar criticized to ncp mla rohit pawar : कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि अतुल भातखळकर यांच्यात सोशल मीडियात चांगलीच जुंपली आहे.

ठळक मुद्देभारतात नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार केला होता.

मुंबई : केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल, अशा शब्दांत भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)  यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भारतात नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार केला होता. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि अतुल भातखळकर यांच्यात सोशल मीडियात चांगलीच जुंपली आहे.

"राजकीय सोयीसाठी आयुष्यभर कोलांट्या मारणाऱ्या शरद पवार यांच्या नावाने भूमिका बदलण्याबाबत दुसऱ्यावर टीका करावी, हे जरा अतीच नाही का रोहित पवार? केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल", असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, देश कोरोनाच्या संकटात असताना व राज्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले असतानाही दिल्लीत हजारो कोटींच्या नव्या संसद भवनाचे काम सध्या सुरू आहे. रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. केंद्र सरकारने प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले होते. त्यांच्या या ट्विटवर अतुल भातखळकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती.

('युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा)

"मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी," असे म्हणत अतुल भातखळकरांनी रोहित पवारांवर टीकेचा बाण सोडला होता. 

'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...'रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपाला सुनावले आहे. "युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असे ऐकले होते. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच", असे ट्विट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार?"प्रत्येक गोष्टीचे गांभीर्य पाहून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे, याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी रुपयांचा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून 'सेंट्रल विस्टा' प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही," असे ट्वीट करत रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस