शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

मोठी बातमी! LJP नंतर आता काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता; १३ आमदार पक्ष सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 11:29 AM

Bihar Political Crisis: राजस्थान, पंजाब या राज्यानंतर आता बिहारमध्येही काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता असल्यानं पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे अनेक नेते जेडीयू नेत्यांचसोबत चर्चा करत आहेत. केवळ संख्याबळाची वाट पाहत आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी जेडीयूचे नेते अनेक मिशनवर काम करत आहेत. मागील आठवड्यात काही नेत्यांसोबत जेडीयू नेत्याची बैठक झाली.पक्षांत्तर बंदी कायद्याप्रमाणे काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि आमदारांना पक्षात घेण्यासाठी १३ आमदारांची गरज आहे.

पटना – बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. लोजपाचे(LJP)चे ५ खासदार अचानक फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात पुढील रणनीती अंतर्गत काँग्रेसमध्ये फूट पाडून एनडीए मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जेडीयू(JDU) आणि भाजपा(BJP) दोघांनीही आपापल्या रणनीतीवर काम करण्यास सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अनेक नेते जेडीयूसोबत येण्याचे संकेत मिळत आहेत. जर हे असेच घडले तर बिहारमध्ये लोजपानंतर आणखी एक मोठा पक्ष फुटण्याच्या स्थितीत असेल. काँग्रेसचे अनेक नेते जेडीयू नेत्यांचसोबत चर्चा करत आहेत. केवळ संख्याबळाची वाट पाहत आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी जेडीयूचे नेते अनेक मिशनवर काम करत आहेत. मागील आठवड्यात काही नेत्यांसोबत जेडीयू नेत्याची बैठक झाली. काँग्रेसकडे सध्या विधानसभेत १९ आमदार आहेत. पक्षांत्तर बंदी कायद्यात न अडकण्यासाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि आमदारांना पक्षात घेण्यासाठी १३ आमदारांची गरज आहे. हा आकडा जुळवण्यासाठी अडचण येत आहे. परंतु १३ आमदारांची साथ मिळताच जेडीयू काँग्रेसला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.

NDA च्या सहकारी पक्षांनाही बसणार चाप

अलीकडच्या दिवसात जीतन राम मांझी आणि मुकेश सहानी यांच्या विधानांमुळे NDA मध्ये वातावरण तापलं होतं. जीतन राम मांझी मागील काही दिवसांपासून समन्वयक समितीच्या बैठकीची मागणी करत भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत असल्याने NDA त खळबळ माजली आहे. मी नितीश कुमार यांच्यासोबत आहे असं जीतन राम मांझी म्हणत आहेत. तर दुसरीकडे मुकेश सहानी यांचे वक्तव्य आणि मांझी यांच्यासोबत भेटीनं एनडीएत सगळं काही ठीक आहे असं वाटत नाही. लालूप्रसाद यादव यांच्या वाढदिवशी मांझी तेजप्रताप यांच्या घरी पोहचले होते. तिथे त्यांनी लालू यांच्यासोबत फोनवरून १० मिनिटं संवाद साधला. त्यामुळे काँग्रेस फुटली तर सहकारी पक्षांवर अंकुश ठेवणं NDA ला सोयीस्कर जाणार आहे.

लोकजनशक्ती पार्टीत उभी फूट

लोकजनशक्ती पार्टीच्या सहा पैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व बंडाळीचे नेतृत्व अन्य कुणी नाही तर रामविलास पासवान यांचे बंधू आणि चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस हे करत आहेत. पशुपती पारस हे अलौली मतदारसंघातून पाचवेळी आमदार म्हणून निवडून आळे आहेत. त्यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून ते वेगवेगळ्या पक्षांमधून प्रवास केल्यानंतर आता लोकजनशक्ती पार्टीकडून निवडणूक लढवत होते. त्यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभेत प्रवेश केला होता. मिळत असलेल्या माहितीनुसार खासदार पशुपती पारस यांच्या नेतृत्वामध्ये पक्षातील अन्य चार खासदारही पक्षापासून वेगळे होण्याची तयारी करत आहेत. हे सर्व खासदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. पशुपती पारस यांचे नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते जेडीयूमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मात्र पशुपती पारस यांनी बंडखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार