पार्थ पवार उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता; बारामतीत अजितदादांच्या कुटुंबीयांची बैठक?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 07:06 PM2020-08-14T19:06:41+5:302020-08-14T19:09:16+5:30

आज दुपारी पार्थ पवार पुण्याला रवाना झालेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातच आहे. पालकमंत्री या नात्याने अजित पवार उद्या पुण्यात झेंडावंदन करणार आहेत.

Big decision on Parth Pawar likely tomorrow; Meeting of Ajit Pawar family in Baramati Sharad Pawar | पार्थ पवार उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता; बारामतीत अजितदादांच्या कुटुंबीयांची बैठक?

पार्थ पवार उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता; बारामतीत अजितदादांच्या कुटुंबीयांची बैठक?

Next
ठळक मुद्देश्रीनिवास पवार करणार मध्यस्थी, पार्थबाबत निर्णय होणारशरद पवारांच्या जाहिर वक्तव्यामुळे अजित पवारही नाराजपार्थ यांच्या मामांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे.

मुंबई – अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना जाहिररित्या आजोबांनी फटकारल्यानंतर पवार कुटुंबातील कलह पुन्हा समोर आल्याचं दिसून येते. पार्थ पवार लहान आहे, हळूहळू तयार होतील पण असं जाहिरपणे त्याला बोलणं योग्य नाही अशी नाराजी अजितदादांनी शरद पवारांना बोलून दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पार्थ पवार नेमकी पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.

आज दुपारी पार्थ पवार पुण्याला रवाना झालेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातच आहे. पालकमंत्री या नात्याने अजित पवार उद्या पुण्यात झेंडावंदन करणार आहेत. त्यानंतर पार्थ आणि अजित पवार दोघंही बारामतीला रवाना होणार आहे. त्यानंतर  पार्थ पवार यांच्याबाबत श्रीनिवास पवार यांच्या घरी बैठक होणार असल्याची माहिती आहे. यानंतर पार्थ काहीतरी मोठा निर्णय घेईल असंही सांगण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.

अजित पवारांचे मौन कायम

सिल्व्हर ओकवरील रात्रीच्या घडामोडीनंतर गुरुवारी दिवसभर पार्थ पवारच्या गोटात सामसूम होती. तर अजित पवारांनी देखील या विषयावील आपले मौन सोडले नाही. दिवसभराच्या बैठका आटोपून ते तडक पुण्याला निघून गेले.

कोण आहेत श्रीनिवास पवार?

श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता.

पार्थ पवारांचा कोणी वापर करुन घेतंय, शिवसेनेला शंका

सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणे हा मूर्खपणा असला तरी महाराष्ट्रातील अनेक अनुभवी, जुनेजाणते लोकही सीबीआयची 'री' ओढत आहेत. सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव आहे असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

पार्थ प्रकरणात कुटुंबाची साथ

माजी मंत्री आणि शरद पवारांचे जवळचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांच्या नातवानेही फेसबुक पोस्ट लिहून पार्थ यांचं कौतुक केलं होतं. आपण उस्मानाबादचे आहोत, कसं लढायचं हे आपल्याला माहित आहे. तुम्ही जन्मापासूनच योद्धे आहात, हे मी लहानपणीपासूनच पाहत आलोय, असे म्हणत मल्हार पाटील यांनी पार्थ यांचं समर्थन केलं आहे. मल्हार पाटील हे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आहेत ज्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. माजी खासदार पद्मसिंह पाटलांची बहिण ही अजित पवारांची पत्नी आहे.  

 

Web Title: Big decision on Parth Pawar likely tomorrow; Meeting of Ajit Pawar family in Baramati Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.