शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विजयानंतरही भाजापाकडून आसाममध्ये मुख्यमंत्री बदलण्याची तयारी; या बड्या नेत्याचे नाव आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 4:35 PM

Assam Assembly Election 2021: आसाममधील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता आसाममध्ये नेतृत्वबदल करण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे

ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महाजोत आघाडीचे आव्हान परतवून लावलेभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ७५ जागांवर विजय मिळाला आसाममधील विजयानंतर भाजपाकडून राज्यात नेतृत्वबदल करण्याच्या हालचाली सुरू

नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आसाममधील सत्ता कायम राखण्यात भाजपाला यश आले होते. (Assam Assembly Election 2021) मात्र निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता आसाममध्ये नेतृत्वबदल करण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. येथे विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल ( Sarbananda Sonowal ) यांच्याऐवजी पूर्वोत्तर भारतात भाजपाचा विस्तार करणाऱ्या बड्या नेत्याकडे (Himanta Biswa Sarma ) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्याची तयारी पक्षनेतृत्वाकडून करण्यात येत आहे. (BJP ready to change CM in Assam even after victory; The name of Himanta Biswa Sarma is at the forefront for CM Post)

आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महाजोत आघाडीचे आव्हान परतवून लावले होते. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ७५ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, आसाममधील विजयानंतर भाजपाकडून राज्यात नेतृत्वबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी दिग्गज नेते हेमंत बिस्वा शर्मा यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत हेमंत बिस्वा शर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. 

राज्यात सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आज दिल्लीमध्ये आले होते. येथे त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.   

दरम्यान, नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ७५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५० जागांवर समाधान मानावे लागले होते. तर इतरांच्या खात्यात एक जागा गेली होती.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाSarbananda Sonowalसर्वानंद सोनोवालPoliticsराजकारण