शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सोनोवाल, जे. पी. नड्डांसह ८ जणांविरुद्ध तक्रार, जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याचा काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:01 AM

जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा , प्रदेशाध्यक्ष रंजीतकुमार दास यांच्यासह आठ वर्तमानपत्रांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.   

गुवाहाटी :  जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा , प्रदेशाध्यक्ष रंजीतकुमार दास यांच्यासह आठ वर्तमानपत्रांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.   (Complaint against 8 people including  J. P. Nadda &  Sonowal, allegation of printing in the form of advertisement news)काँग्रेसचा आरोप आहे की, आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अप्पर आसाममधील सर्व जागा जिंकत असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात बातमीच्या स्वरुपात छापण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन,  निवडणूक आयोगची मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केल्याचे काँग्रेसचे कायदा विभागाचे अध्यक्ष निरन बोरा यांनी सांगितले. बोरा म्हणाले की, मुख्यमंत्री सोनोवाल, भाजपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि इतर सदस्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदारांना प्रभावित करण्यासाठी पूर्वनियोजित पद्धतीने विविध वर्तमानपत्रात बातमीच्या स्वरुपात जाहिरात छापली आहे. यामध्ये भाजप २७ मार्च रोजी पहिल्या  टप्प्यात झालेल्या अप्पर आसाममधील सर्व जागा जिंकत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांच्याकडे यांच्याकडे तक्रार करत पोलिसात तक्रार दिलेल्या व्यक्ती आणि वर्तमान पत्रांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.  दरम्यान या प्रकाराची निवडणूक आयोग चौकशी करेल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांने रविवारी रात्री दिली आहे.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण