शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडें असे काही करणार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 13:00 IST

ashish shelar reaction on pankaja munde: पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांच्या आक्रोशाला पक्ष द्रोह मानण्याचे कारण नाही

कोल्हापूर: केंद्रीय मंत्रिमंडळात खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्यामुळे बीड जिल्हा भाजपत असंतोष पसरला आहे. जिल्ह्यातून अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपल्या पदाचे राजीनामे पाठविले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंडे भगिनी मुंबईत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, मुंडेच्या नाराजीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठे विधान केले आहे. 

आशिष शेलार आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापुरात माध्यमांशी बोलत असताना त्यांनी पंकजा मुंडेचे कोणतेही दबाव तंत्र नाही. त्या कधीच असे करणार नाहीत, असे मत व्यक्त केले आहे. तसेच, कधी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आक्रोश होतो. त्याला काही पक्ष द्रोह मानण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.

नाना पटोलेंच्या विधानावर टीकाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, नाना पटोले कधीच आपल्या विधानावर ठाम राहत नाहीत. ते नेहमीच विधान बदलतात. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले, त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचे वक्तव्य बदलले. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील. जो माणूस स्वत: च्या विधानावर टिकू शकत नाही. त्याची केस काय टिकणार?, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Shelarआशीष शेलारPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMumbaiमुंबईkolhapurकोल्हापूर