"सध्या अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, पण…" काँग्रेसने मांडली वेगळी भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 06:38 PM2021-03-22T18:38:47+5:302021-03-22T18:51:23+5:30

Congress reaction on Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. तर शिवसेनेकडूनही त्यांचा बचाव केला जात आहे. मात्र आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मात्र या प्रकरणात काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे.

Anil Deshmukh : "There is no need for Anil Deshmukh to resign at the moment,' but" Congress leader Balasaheb Thorat has taken a different stance | "सध्या अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, पण…" काँग्रेसने मांडली वेगळी भूमिका 

"सध्या अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, पण…" काँग्रेसने मांडली वेगळी भूमिका 

Next

मुंबई - परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या महाविकास आघाडी सरकारच्या गोटात खळबळ उडालेली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक झालेल्या विरोधकांना थोपवण्याठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. तर शिवसेनेकडूनही त्यांचा बचाव केला जात आहे. मात्र आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मात्र या प्रकरणात काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे. ("There is no need for Anil Deshmukh to resign at the moment,' but" Congress leader Balasaheb Thorat has taken a different stance)

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर विरोधकांकडून देशमुख यांच्या राजीनाम्याच्या होत असलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची सध्यातरी गरज नाही, असे मला वाटते. अशा प्रकारची पत्रं येतंच राहतील.  मात्र या प्रकरणात परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्राची चौकशी करण्यास आमची हरकत नसेल. बाकी या प्रकरणी सिंह यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. आता सुप्रीम कोर्टात जो निर्णय होईल तो होईल.  

दरम्यान, परमबीर सिंह यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून ते पत्र लिहिले असावे, अशी शंकाही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत त्यांच्या पक्षाचा निर्णय सांगितला आहे. मात्र जिलेटिन कार, हिरेन प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. 

Web Title: Anil Deshmukh : "There is no need for Anil Deshmukh to resign at the moment,' but" Congress leader Balasaheb Thorat has taken a different stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.