शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही; चंद्रकांत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 07:52 PM2021-02-10T19:52:05+5:302021-02-10T19:54:34+5:30

Chandrakant Patil on shivsena : शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा (Amit Shah) यांनी केलीच नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

amit Shah did not use language to finnish Shiv Sena says Chandrakant Patil | शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही; चंद्रकांत पाटलांचा दावा

शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही; चंद्रकांत पाटलांचा दावा

Next

शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा (Amit Shah) यांनी केलीच नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ते चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. "शिवसेनेला खरं बोललं की झोंबतं. अमित शहा हे खरं बोलले ते शिवसेनेला फारच झोंबलेलं दिसतंय. पण मुख्य म्हणजे शहा यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नाही", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Amit Shah Never Use The Language To Finnish Shiv Sena In Maharashtra) 

हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा; शिवसेनेचे अमित शहांना आव्हान

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गिरीश प्रभुणे यांची भेट घेण्यासाठी चंद्रकांत पाटील आज चिंचवड येथील गुरुकुलम येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "आम्ही कधीच खुन्नसपणे वागलो नाही. गेल्या १४-१५ महिन्यांमध्ये ज्यापद्धतीनं सरकारचा व्यवहार चालला आहे. तो आम्ही पाच वर्ष आमच्याकडे राज्य असताना केला असता शिवसेना संपली असती हे खरं आहे. पण शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

चार भिंती, दरवाजा अन् कडी; 'मातोश्री'वरील ठाकरे-शहांच्या भेटीत नेमके घडले काय?

नारायण राणे यांच्या 'लाइफटाइम' या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात आले होते. शहा यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. "अमित शहा यांच्या भाषणानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली की शिवसेनेला कुणी संपवू शकत नाही. मुख्य म्हणजे अमित शहा यांनी शिवसेनेला संपविण्याची भाष केलीच नाही. समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणं, लागेल असं बोलणं ही आमची आणि अमित शहा यांची संस्कृती नाही", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

Web Title: amit Shah did not use language to finnish Shiv Sena says Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.