स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 15:01 IST2024-06-02T14:59:10+5:302024-06-02T15:01:20+5:30

राजकुमार रावने कपिल शर्मा शोमध्ये सुरुवातीच्या काळात एका व्यक्तीने त्याला दहा हजारांना कसं गंडवलं, याचा खुलासा केलाय (rajkumar rao)

mr and mrs mahi star Rajkummar Rao's fraud of 10 thousand during the struggle period | स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

राजकुमार राव हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. 'शाहीद', 'बरेली की बर्फी', 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', 'फन्ने खान', 'काय पो चे' अशा विविध सिनेमांमधून राजकुमार रावने प्रेक्षकांचं मन जिंकलं. यावर्षी राजकुमारने 'श्रीकांत' सिनेमात दिव्यांग व्यावसायिक श्रीकांत बोल्ला यांची भूमिका साकारुन आदर्श अभिनयाचा वस्तूपाठ सर्वांसमोर ठेवला. नुकताच राजकुमारची भूमिका असलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा रिलीज झालाय. त्यानिमित्त 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झालेल्या राजकुमारने स्ट्रगलच्या काळात तब्बल दहा हजार रुपयांना तो कसा फसला, याचा खुलासा केलाय.

अशी झाली राजकुमार रावची फसवणूक

राजकुमारने 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये तो दहा हजार रुपयांना कसा फसला, याचा उलगडा केला. झालं असं की.. सिनेमात काम मिळवून देतो असं एका व्यक्तीने राजकुमारला आश्वासन दिलं होतं. त्यामुळे त्या व्यक्तीला भेटण्यासाठी राजकुमार सायकल दामटवत गुडगावहून थेट दिल्लीला गेला. त्यावेळी सिनेमा असो वा टीव्ही राजकुमारला फक्त अभिनय करायचा होता.

राजकुमारकडून १० हजार रुपये उकळले अन् पुढे...

राजकुमार पुढे त्या व्यक्तीच्या ऑफिसला पोहोचला.  तिथे छान सेटअप होता. त्या व्यक्तीचे प्रसिद्ध स्टार्ससोबत फोटोही होता. व्यक्ती विश्वासातला वाटत होता. नंतर त्याने राजकुमारकडून १० हजार रुपये घेऊन त्याचं  फोटोशूट केलं. याशिवाय लवकरच त्याला एखादा रोल देण्याची ऑफरही दिली. पुढे राजकुमारची एका भूमिकेसाठी निवड झाल्याची खुशखबर त्या व्यक्तीने दिली. राजकुमार आनंदात दिलेल्या वेळी त्याच्या ऑफिसला गेला. पण त्याच्या ऑफिसला टाळं होतं. तो व्यक्ती पैसे घेऊन पळून गेल्याचं राजकुमारला समजलं. अशाप्रकारे राजकुमार दहा हजारांना गंडवला गेला. राजकुमार आणि जान्हवी कपूरची भूमिका असलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाची सध्या चर्चा आहे.

Web Title: mr and mrs mahi star Rajkummar Rao's fraud of 10 thousand during the struggle period