हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा; शिवसेनेचे अमित शहांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 09:12 PM2021-02-07T21:12:58+5:302021-02-07T21:18:46+5:30

Shivsena to Amit Shah: हेमराज शाह यांचे मोदी, शाह आणि रुपाणी यांना आव्हान    

change name of Ahmedabad to Karnavati; Shivsena gave challenge to amit shah | हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा; शिवसेनेचे अमित शहांना आव्हान

हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा; शिवसेनेचे अमित शहांना आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरात चे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 'अहमदाबाद' चे नामांतर 'कर्णावती' करुन दाखवावे, असे  व्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले. (Shivsena gave challange to Amit shah, CM vijay Rupani.)

शिवसेना पक्षप्रमुख आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने आज शिवसेनेच्या  मालाड येथे झालेल्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या  मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, असे सांगून हेमराज शाह म्हणाले कीं, 'अहमदाबाद'ला कर्णावती हे नाव आहे. परंतू रितसर 'कर्णावती' हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबाद ला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नांवाला सुद्धा एक इतिहास आहे. मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नांवे देण्यात हरकत काय आहे ?असा सवाल त्यांनी केला.

 महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार म्हणजेच शिवशाही सरकार १९९५ साली अधिकारारुढ झाल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे धाराशिव करण्यात आले. परंतू काही  लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती म्हणून ती नांवे अंमलात येऊ शकली नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या संपूर्ण गोष्टी माहित असूनही निव्वळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणण्यात येत आहेत अशी टीका त्यांनी केली.

2014 पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असतांना औरंगाबाद आणि उस्मानाबाद चे नामांतर करु शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' किताब देऊ शकले नाहीत. समान नागरी कायदा होण्याबाबत 'अब समय आ गया है !' असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आवर्जून सांगतात परंतू ती वेळ अजूनही आलेला नाही, पर्यायाने ते  होऊ शकलेले नाही. आज देशात लाखो शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असतांना, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. लोकांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा आदर करा आणि 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या केवळ घोषणा न राहता त्या अंमलात कशा येतील त्यासाठी प्रयत्न करा. औरंगाबाद, उस्मानाबाद या बरोबरच अहमदाबाद चे नामांतर करण्यात यावे, तशाच पद्धतीने मोगलांच्या, ब्रिटीशांच्या खुणा, आठवणी पुसून काढाव्यात, असे कळकळीचे आवाहनही हेमराज शाह यांनी शेवटी केलेे.

Web Title: change name of Ahmedabad to Karnavati; Shivsena gave challenge to amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.