Akhil Gogoi, becomes first person to win election from jail in Assam; 85-year-old mother done campaign | आसाममध्ये जेलमधून निवडणूक जिंकणारे पहिले व्यक्ती ठरले अखिल गोगोई, 85 वर्षांच्या आईनं केला प्रचार!

आसाममध्ये जेलमधून निवडणूक जिंकणारे पहिले व्यक्ती ठरले अखिल गोगोई, 85 वर्षांच्या आईनं केला प्रचार!

ठळक मुद्दे85 वर्षांच्या वृद्ध आईने आपल्या तुरूंगात असलेल्या मुलासाठी सिबसागरच्या रस्त्यावर प्रचार केला, ज्याचा परिणाम मतदारांवर झाला

सिबसागर - सुधारित नागरिकत्व कायद्यास (सीएए) विरोध असणारे कार्यकर्ता अखिल गोगोई हे आसामच्या तुरूंगातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी सिबसागर मतदारसंघातील भाजपा पक्षाच्या प्रतिस्पर्धी सुरभि राजकोनवारी यांचा  11,875  मतांनी पराभव केला. नव्याने तयार झालेल्या रायझोर दलाचे संस्थापक देशद्रोहाच्या आरोपाखाली डिसेंबर 2019 पासून तुरूंगात आहेत. अपक्ष म्हणून लढलेल्या अखिल गोगोई यांना 57,219 मते मिळाली, ती 46.06 टक्के मते आहेत. सुरुवातीला काँग्रेसने रायझोर दलाच्या प्रमुखांना पाठिंबा दर्शविला पण नंतर तिसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या सुभ्रमित्रा गोगोई यांना तिकीट दिले होते.

माहिती अधिकार कार्यकर्त्याने राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात तुरूंगातून अनेक पत्रे लिहिली आणि सुधारण्याची गरज असलेल्या समस्या ठळकपणे मांडल्या. त्यांच्या 85 वर्षांच्या वृद्ध आईने आपल्या तुरूंगात असलेल्या मुलासाठी सिबसागरच्या रस्त्यावर प्रचार केला, ज्याचा परिणाम मतदारांवर झाला असेल. प्रियदा गोगोई यांच्या चिकाटीने प्रभावित, सुप्रसिद्ध समाजसेवक मेधा पाटकर आणि संदीप पांडे अप्पर आसाम शहरात पोहोचले आणि अखिल गोगोई यांच्या आईसमवेत या प्रचार मोहिमेमध्ये सामील झाले होते.

रायझोर दलाच्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी मतदारांची मनं वळवण्यासाठी घरोघरी प्रचार केला. मतदारसंघातील जनतेला संबोधित करणारे राजकोनवारी यांच्या समर्थनार्थ भाजपाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना प्रचारासाठी उभे केले. पण अखेर अखिल गोगोई विजयी ठरले आणि त्यांच्याकडे रोख पैसे नव्हते. गुवाहाटीतील कॉटन कॉलेजात पदवी घेतलेल्या  46 वर्षीय अखिल गोगोईसाठी निवडणूक राजकारण नवीन नाही. 1995-96 मध्ये ते कॉटन कॉलेज विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस होते.

२०१९ मध्ये नॅशनल एजन्सी एजन्सीने (एनआयए) राज्यात हिंसक सीएएविरोधी निदर्शनांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. राजकीय विश्लेषक  अतीक-उर-रहमान बारभुइयां  म्हणाले की, अखिल गोगोई यांचा विजय ऐतिहासिक आहे, कारण असे माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर तो एकमेव राजकीय कैदी आहे. फर्नांडिस यांनी १९७७ सालची लोकसभा निवडणूक बिहारच्या मुझफ्फरपूर सीटवरुन लढविली आणि तीन लाख मतांनी विजय मिळविला. रायझोर दलाचे प्रख्यात सदस्य न्यायालयात जाऊन अखिल गोगोई यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती करतील.

सीएएविरोधात गोगोई यांचा सहभाग आणि अटक 

शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्याविरोधात ‘एनआयए’मार्फत देशद्रोह आणि दहशतवादी कारवायांविषयीचे आरोपपत्र दाखल केल्यामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर तीव्र रोष व्यक्त होत होता. 

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २९ मे २०२० रोजी गोगोई आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आसामात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरुद्ध हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनात गोगोई यांची सक्रिय भूमिका होती, असा आरोप ठेवण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि दहशतवादी कारवायांची कलमे लावण्यात आली आहेत. आरोपपत्रातील तपशील जाहीर झाल्यानंतर सोनोवाल यांच्या फेसबुक पेजवर विभिन्न प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. एका व्यक्तीने लिहिले की, ‘आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी’ आहोत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही स्वातंत्र्यसैनिकांना समर्थन दिले होते. आरएसएस आणि भाजपने मात्र इंग्रजांना साथ दिली होती.’ आरोपपत्रात म्हटले आहे की, गोगोई आणि त्यांच्या साथीदारांनी कम्युनिस्ट जाहीरनामा, मार्क्स आणि माओच्या जीवनाचा उल्लेख केला आहे. ते मित्रांना कॉम्रेड संबोधतात तसेच अभिवादनासाठी लाल सलाम म्हणतात. यावरून त्यांचे प्रतिबंधित भाकपा (माओवादी) या संघटनेशी संबंध असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Akhil Gogoi, becomes first person to win election from jail in Assam; 85-year-old mother done campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.