शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 14:49 IST

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे.

ठळक मुद्देभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी RSS चीपंतप्रधान मोदी चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतातनोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका

हैदराबाद: आताच्या घडीला देशात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, इंधनदरवाढ, महागाई यांसह भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून सुरू असलेला संघर्ष याचाही समावेश आहे. देशाने आत्मनिर्भर व्हायला हवे. आपण जेवढं आत्मनिर्भर असू तेवढेच सुरक्षित असू, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. यावर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे. (aimim asaduddin owaisi criticized rss mohan bhagwat over indian economy and china border dispute)

“मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी...”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा

नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. मोहन भागवत म्हणतात की आपण चीनवर अवलंबून राहायला नको. मग देशावर नोटाबंदी कोणी लादली, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्यासाठी कोण जबाबदार आहे, असा सवाल करत याचे उत्तर केवळ मोदी सरकार आहे, या शब्दांत असदुद्दीन ओवेसी केंद्रातील मोदी सरकार आणि मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. 

तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

मोहन भागवत खरंच खरे देशभक्त असतील, तर... 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी RSS ची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावे. कोरोना महामारीत मोदी सरकारने जनतेसाठी आणलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झालेय. मोहन भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत मोहन भागवत यांचे विधान बोगस आहे, असल्याचा घणाघात ओवेसी केला आहे. चीनी सैनिक भारतात घुसून बसले आहेत, ही वास्तविकता आहे आणि ती मोहन भागवतांना दिसत नाही. देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आहे. नोटाबंदीचे दुष्परीणाम देश अद्यापही भोगत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

दरम्यान, आपण इंटरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. जे मूळ रूपाने भारतातून येच नाही. आपण कितीही चीनबाबत ओरडलो, तरी आपल्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या चीनमधूनच येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून राहणे कमी होणार नाही, तोवर चीनसमोर झुकावे लागेल. आत्मनिर्भर बनताना उत्पादनाच्या उत्कृष्टतेवर आपला भर असायला हवा.  छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे., असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाindia china faceoffभारत-चीन तणावDemonetisationनिश्चलनीकरणAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी