शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

सरनाईकांपाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर? 

By कुणाल गवाणकर | Published: November 30, 2020 11:56 AM

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेना नेता आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता

मुंबई: आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असल्याचं वृत्त आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी होणार असल्याचं कळतंय. 'एबीपी माझा'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. टॉप्स एजन्सी प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर गेल्या आठवड्यात ईडीनं धाडी टाकल्या. त्यांचे पुत्र विहंग यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीदेखील केली. त्यानंतर आतापर्यंत ईडीनं आतापर्यंत तीनवेळा विहंग यांना समन्स बजावलं आहे. मात्र ते चौकशीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणात प्रताप सरनाईक यांचीदेखील चौकशी होणार आहे. मात्र परदेशातून आल्यानं ते सध्या क्वारंटाईन आहेत.प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या गैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा? यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याचं समजतं. या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची ईडीकडून मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात चौकशी होऊ शकते. अशी चौकशी झाल्यास शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकार आता ईडीला रोखण्याच्या तयारीत असल्याचं कळतं. सीबीआयला राज्यात येण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता असते. तशाच प्रकारे ईडीलादेखील राज्यात येऊन तपास, चौकशी करण्यासाठी परवानगी घेणं सक्तीचं करू शकतो का, याची चाचपणी सध्या सरकारकडून सुरू आहे.संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा- संजय राऊतकेंद्र सरकार विरोधकांना गप्प बसवण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ईडी, सीबीआयचा वापर शत्रूला जेरीस आणण्यासाठी केला जातो. त्यामुळे ईडी, सीबीआयला केंद्रानं पाकिस्तान, चीनच्या सीमेवर पाठवायला हवं. त्यामुळे आपले शत्रू नामोहरम होतील, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. तुम्हाला ईडीची नोटीस आली का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर अद्याप तरी नोटीस आलेली नाही. मी वाट बघतोय, असं उत्तर राऊत यांनी दिलं. सध्या ईडी, सीबीआयकडून उत्खननाचं काम सुरू आहे. ते हडप्पा, मोहंजोदडोपर्यंत पोहोचले आहेत, असा चिमटादेखील त्यांनी काढला. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग