प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या ग़ैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 10:06 AM2020-11-27T10:06:18+5:302020-11-27T10:17:25+5:30

Pratap Sarnaik News: ईडीचा दावा, घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप

Pratap Sarnaik's 50% share in Tops Group's fraud profit? | प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या ग़ैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा ? 

प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या ग़ैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा ? 

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमएमआरडीएच्या सुरक्षा पुरविरण्याच्या झालेल्या घोटाळ्यात ५० टक्के नफा आमदार प्रताप सरानाईक यांनी लाटल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात केला आहे. आतापर्यंत नोंदविलेल्या जबाबातून ही माहिती समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. यात, अमित चांडोळे हा यात  मध्यस्थी म्हणून काम पहात सरनाईक यांना पैसे पुरवत असल्याचे त्याने ईडीला सांगितले आहे. याबाबत ईडी अधिक तपास करत आहेत.


 गुरूवारी अमितच्या कोठड़ीसाठी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीकड़ून ही माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष महेश अय्यर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, टॉप्स ग्रुपचे अध्यक्ष, प्रमोटर असलेल्या राहुल नंदा आणि अन्य सहा जणांनी टॉप्स ग्रुपच्या अकाउंट मधून भारतातल्या वेगवेगळ्या कंपनीत फंड ट्रान्सफर केला. पुढे हाच फंड स्वतःच्या फ़ायद्यासाठी रियल इस्टेट मध्ये गुंतवून १७५ कोटीचा ग़ैरव्यवहार केल्याचाआरोप आहे.


 त्यांच्या जबाबानुसार, २०१४- १५ मध्ये  टॉप्स ग्रुप सर्विस अँड सोल्यूशन कंपनीने एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पाच्या ठिकाणी महिन्याला ३०० ते ३५० सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट घेतले. यापैकी अवघे ७० टक्के सुरक्षा रक्षक तैनात करत, पूर्ण कामाचे पैसे घेण्यात येत होते. तसेच त्यावर पीएफ आणि ईएसआयसीचाही लाभ घेण्यात आला. 


 यातच टॉप्स ग्रूपच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढून ती टॉप्स ग्रूपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बिजलानीला देण्यात आली.  यात संकेत मोरे आणि अमित चांडोळे यांची एजेंट म्हणून नेमणूक करत, बनावट कागदपत्रे तयार करून ही दुकली पैसे काढत होती. मिळालेल्या पैशातील ५० टक्के रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती. 


तसेच प्रतिमहा ५० हजार रुपये आणि एका सुरक्षा रक्षकामागे पाचशे रुपये महिना अशी रक्कमही दिली जात होती. २०१७ ते जून २०२० या कालावधीत सुमारे सव्वादोन कोटी पैकी ९० लाख रुपये बिजलानी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच इतर रक्कम संकेत मोरे याच्या कंपनीला देण्यात आली आहे. राहुल नंदा प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र आहेत. २ कोटी ३६ लाख कमीशन म्हणून शेअर करण्यात आली आहे. त्यापैकी ९० लाख रुपये बँक ट्रान्सफर करण्यात आली आहेत. २०१४ पासून आतापर्यंत ७ कोटी कमीशन म्हणून देण्यात आले आहे. 


    २४ नोव्हेबर रोजी नीरज बिजलानी यांनी दिलेल्या जबाबातून राहुल नंदा यांनी लंडन स्थित कंपनी शील्ड गार्डिंग कंपनीसाठी २०० ते २५० कोटी खर्च केले आहे. त्यातून दुबई आणि लंडन मध्ये मालमत्ता खरेदी केल्या आहेत. एमएमआरडीएच्या कंत्राटाबाबत विचारणा केली असता, सुरक्षा रक्षकांसाठी महिन्याला ३० ते ३२ लाखाचे कंत्राट होते. यातील नफ्यात प्रताप सरनाईक यांचा ५० टक्के वाटा होता. टॉप्स ग्रुप आणि त्यांच्यात  ५० टक्के भागीदारीत हे काम सुरु होते. याचे प्रॉफिट शेअरिंग शीट फायनांस विभाग तयार करून, संचालकाकड़ून ते मान्य करून घेत होते. अमीत हा त्यांच्यातील मध्यस्थी म्हणून काम करायचा. तो सरनाईक यांचे ही पैसे घेत होता. हा फंड रोख रक्कमेत देण्यात येत होता. यात, ललिता रणदिवे याबाबत रेकॉर्ड ठेवत होती.


   लतिका रणदिवेच्या जबाबानुसार, अमित हा महिन्याला ६ लाख रुपये तीच्या कड़ून घेत होता. नीरज बिजलानीच्यां सांगण्यावरून हे व्यवहार होत होते. याबाबत मजूरीचे पैसे असल्याची नोंद करण्यात येत असे.. तर अमितच्या जबाबानुसार, नंदाच्या मार्फत तो सरनाईकांच्या संपर्कात आला आला. यात टॉप ग्रुप आणि सरनाईक हे ५० टक्के भागीदारीत या कत्रांटाचे काम करत असल्याचे सांगितले आहे. याबाबत कुठलाच लेखी करार करण्यात आलेला नाही. हे फक्त विश्वासार्हतेवर सुरु होते. त्यामुळे या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीने न्यायालयात वर्तवला आहे. तसेच अमित तपासाला सहकार्य करत नसल्याचेही यात नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत

माजी पोलीस महासंचालकांचाही वापर...

अय्यर यांनी कलेल्या आरोपात, नंदा याने २०१६ नंतर स्वतः सह कुटुंबियांचे टॉप्स ग्रुपच्या संकेत तळावरून नाव कमी केले. अन्य संचालकांची नावे टाकली. यात, शेर धारकांचा विश्वास मिळविण्यासाठी माजी पोलीस महासंचालक सतीश माथूर, आयएएस दिनेश कुमार गोयल, इंडियन ओव्हरसिस बँक माजी अध्यक्ष नरेंद्र मेरपाडी, रिटायर्ड जनरल कमलजीत सिंग यांची स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक केली. नंदाच्या हेतू बाबत हे सर्व जण अनभिज्ञ होते. पुढे सरकारी कार्यालयांकडून विविध देणे थकबाकी याबाबतचे पत्र येऊ लागल्यानंतर या सर्वांनी तात्काळ राजीनामे दिले. तर नंदा हे समांतर नवीन कंपनी चालु केली असून येथील बिझनेस तेथे वळवत असल्याचेही नमूद केले आहे.

Web Title: Pratap Sarnaik's 50% share in Tops Group's fraud profit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.