Pimpri Chinchwad: पीएमपीच्या धडकेत तरुण ठार; ढोरे पाटील पुलावर भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 09:20 IST2023-08-21T09:17:15+5:302023-08-21T09:20:08+5:30
या अपघातामध्ये ऋषिकेश भीमराव भालेराव (वय २६) या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला...

Pimpri Chinchwad: पीएमपीच्या धडकेत तरुण ठार; ढोरे पाटील पुलावर भीषण अपघात
पिंपरी : बीआरटीच्या मार्गावर भरधाव जाणाऱ्या दुचाकीने पीएमपीला धडक दिली. या अपघातामध्ये ऋषिकेश भीमराव भालेराव (वय २६) या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी दीडच्या सुमारास ढोरे पाटील पुलावरील बीआरटी मार्गात घडली. याप्रकरणी अशोक बिभीषण गायकवाड (४३, रा. आळंदी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील पीएमपी बस घेऊन चिंचवड डेपोतून मनपाकडे चालले होते. डांगे चौक बीआरटी मार्गातून जात असताना दुपारी दोनच्या सुमारास ऋषिकेश भालेराव हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून बीआरटी मार्गात आला. दुचाकीने पीएमपी बसला समोरून धडक दिली. या अपघातामध्ये ऋषिकेशचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.