हिंजवडीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 16:21 IST2018-08-17T16:20:49+5:302018-08-17T16:21:59+5:30
हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली.

हिंजवडीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
वाकड : हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. हसीना पटेल (वय १८, रा. हिंजवडी फेज २, मूळगाव कर्नाटक) असे त्या तरुणीचे नाव आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनाचे वडील या भागात मॅगीचे डिस्टयूब्युटरकडे रखवालदार म्हणून काम करतात. या गोदामाशेजारीच पत्र्याच्या खोलीत या कुटुंबियांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान,शुक्रवारी पहाटे आई-वडील दोघेही आपापल्या कामावर निघून गेले. यावेळी हसीनाचा मामा व भाऊ घरी होते. भावाने घरातील चावी घेऊन गोदामाचे शटर उघडले असता हसीनाने गोदामातील गार्बेजच्या खोलीत लोखंडी रॉडला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.