‘पार्ट टाइम’ पैशाच्या नादात तरुणीने गमावले एक कोटी, देहूरोड परिसरातील घटना

By प्रकाश गायकर | Published: May 3, 2024 05:18 PM2024-05-03T17:18:25+5:302024-05-03T17:19:30+5:30

याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि.२) फिर्याद दिली आहे....

Young woman lost Rs 1 crore in 'part time' money, incident in Dehuroad area | ‘पार्ट टाइम’ पैशाच्या नादात तरुणीने गमावले एक कोटी, देहूरोड परिसरातील घटना

‘पार्ट टाइम’ पैशाच्या नादात तरुणीने गमावले एक कोटी, देहूरोड परिसरातील घटना

पिंपरी : पार्ट टाइम जॉब व त्यामधून अधिकचे उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगत विविध प्रकारचे टास्क दिले. त्यामधून १ कोटी २ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेत तरुणीची फसवणूक केली. ही घटना ३ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत देहूरोड येथे घडली. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि.२) फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, ९५७१८६६८७६ या व दोन इतर टेलिग्राम आयडीधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या घरी असताना संशयित आरोपींनी त्यांच्याशी ऑनलाइन माध्यमातून संपर्क केला. त्यांना टेलिग्रामवरून पार्ट टाइम काम व अधिकचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रीपेड टास्कची माहिती दिली. त्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यात १ कोटी २ लाख ८३ हजार ८४८ रुपये जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर ते पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.

Web Title: Young woman lost Rs 1 crore in 'part time' money, incident in Dehuroad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.