झाडाला कापडाच्या साहाय्याने तरुणानं घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 21:49 IST2021-09-23T21:48:47+5:302021-09-23T21:49:14+5:30
किवळे येथे पवना नदीच्या परिसरात पुणे-मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

झाडाला कापडाच्या साहाय्याने तरुणानं घेतला गळफास
पिंपरी : झाडाला कापडाच्या साह्याने गळफास घेतलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला. किवळे येथे पवना नदीच्या परिसरात पुणे-मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
रावेतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथे पवना नदीच्या परिसरात महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत शेतातील एका झाडाला कापडाच्या साह्याने एका ३० ते ३५ वर्षे वयाच्या पुरुषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
तेथील खासगी रोपवाटिकाचे चालक प्रसाद धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने चार ते पाच दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. तरुण रंगाने काळा सावळा असून, अंगात टीशर्ट व काळी पॅन्ट त्याने परिधान केली होती. याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.