Pune : कानशिलात लगावून तरुणीचा विनयभंग; जिवे मारण्याचीही दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:25 IST2022-11-07T12:21:36+5:302022-11-07T12:25:02+5:30

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार...

Young girl molested by hitting on face and Threatened to kill pune crime news | Pune : कानशिलात लगावून तरुणीचा विनयभंग; जिवे मारण्याचीही दिली धमकी

Pune : कानशिलात लगावून तरुणीचा विनयभंग; जिवे मारण्याचीही दिली धमकी

पिंपरी : तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणत तरुणाने तरुणीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिचा विनयभंग करून शिवीगाळ केली. तसेच तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तरुण पळून गेला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. ३) दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

दीपक सूर्यकांत गावडे (रा. साईनगर, गहुंजे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ब्युटीशियन पार्लरच्या कोर्ससाठी पायी चालत जात होती. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादी तरुणीला रस्त्यामध्ये अडवले. तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून थोबाडीत मारून आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. तरुणी ओरडल्यानंतर आरोपीने तिला शिवीगाळ करून

Web Title: Young girl molested by hitting on face and Threatened to kill pune crime news