शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

बटन दाबा, पोलीस हजर पद्धतीने नव्या पोलीस आयुक्तालयाचे कामकाज : आर.के. पद्मनाभन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 3:48 PM

नागरिकांनी मदतीसाठी पोलिसांपर्यंत जाण्यापेक्षा पोलीसच नागरिकांच्या मदतीला धावून जाणार: आर.के. पद्मनाभन

ठळक मुद्देपोलीसच मदतीसाठी नागरिकापर्यंत पोहोचणार असल्याचा पोलीस आयुक्तांचा दावा 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यामुळे या शहराला आवश्यक तो पोलीस स्टाफ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मदतीसाठी पोलिसांपर्यंत जाण्यापेक्षा पोलीसच नागरिकांच्या मदतीला धावून जातील. बटन दाबा, पोलीस हजर अशा पद्धतीने नव्या पोलीस आयुक्तालयामार्फत कामकाज केले जाणार आहे. असा विश्वास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनी आॅटो क्लस्टर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यान्वित झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त पद्मनाभन बोलत होते. औद्योगिकनगरीचे गुन्हेगारीत रूपांतर झाले असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत आपण या शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमके काय करणार? या प्रश्नाला आयुक्त पद्मनाभन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, स्वतंत्र पोलीस आयुक्त झाल्यामुळे अधिकचा स्टाफ उपलब्ध होणार आहे. स्वतंत्रपणे विविध विभागाचे काम चालणार आहे. पोलीस आयुक्तालयाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राहील. जनता पोलिसांकडे नाही तर पोलीस जनतेकडे जातील, अशा पद्धतीने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज केले जाणार आहे. एखादी घटना घडते, त्यानंतर पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दखल घेतली तर जो परिणाम जाणवतो, तो परिणाम अर्धा तासाने दखल घेतल्यानंतर जाणवत नाही, आणखी काही तासांनी दखल घेतल्यानंतर वेगळाच परिणाम दिसून येतो. घटना एकच परंतु परिणाम वेगवेगळे दिसून येतात. त्यामुळे तत्काळ पोलिसांकडून दखल घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. चौका चौकांत पोलीस असतील, कायदा, सुव्यवस्थेच्या दक्षतेसाठी पोलीस कायम सज्ज आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा शहराची कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. त्यादृष्टीने योग्य नियोजन केले जाणार आहे. विविध शहरांत काम केल्याचा अनुभव गाठीशी आहे़ येथे काम करताना तो अनुभव निश्चितच कामी येईल, असे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस