पीएमपीच्या प्रवासात महिला प्रवाशाचे गंठन चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:48 IST2018-08-25T16:48:01+5:302018-08-25T16:48:37+5:30
पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या पर्समधून सोन्याचे गंठन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार उघडकीस आला.

पीएमपीच्या प्रवासात महिला प्रवाशाचे गंठन चोरीला
पिंपरी-चिंचवड (वाकड) : पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या पर्समधून सोन्याचे गंठन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत कविता दादासाहेब सोनवणे (वय ३६, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी फिर्यादी ह्या पीएमपीएल बसने १६ नं ते जगताप डेअरी चौकापर्यंत जात होत्या. दरम्यानच्या वेळात त्यांच्या पर्स मधील ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठन व नऊशे रुपये रोख पर्समधून चोरून नेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात या चोरीची फिर्याद दिली.