डंपर अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू; भोसरीतील घटना; पोलिसांनी केली चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 20:26 IST2020-08-27T20:25:36+5:302020-08-27T20:26:29+5:30

फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून भोसरीकडून कासारवाडीकडे जात होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली..

Women died after dumper overturns; Incidents in Bhosari | डंपर अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू; भोसरीतील घटना; पोलिसांनी केली चालकाला अटक

डंपर अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू; भोसरीतील घटना; पोलिसांनी केली चालकाला अटक

पिंपरी : डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला रस्त्यावर पडली. त्यानंतर डंपर महिलेच्या अंगावरून गेला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. पुणे - नाशिक महामार्गावर भोसरी येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे.
पल्लवी अरुण किरवे (वय ३८, रा. गणपती माथा, वारजे माळवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पल्लवी यांचे पती अरुण रामचंद्र किरवे (वय ४८) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिरूद दाजीराव साळुंके (वय ५३, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण आणि त्यांच्या पत्नी पल्लवी त्यांच्या दुचाकीवरून भोसरीकडून कासारवाडीकडे जात होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात पल्लवी रस्त्यावर पडल्या. त्यावेळी अंगावरून डंपर गेल्याने पल्लवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अरुण यांना गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.

Web Title: Women died after dumper overturns; Incidents in Bhosari