शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

स्त्रिया, दलितांना हवे ख-या अर्थाने स्वातंत्र्य - सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:44 AM

राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलितांना खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.

तळेगाव दाभाडे - राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलितांना खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहि:शाल विभाग, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आणि तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावरील व्याख्यानात सुभाष वारे बोलत होते.या वेळी प्राचार्य डी. डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील डॉ. भौमिक देशमुख, इंद्रायणी फार्मसी विभागाचे प्राचार्य बी. बी. जैन, प्रा. एस. एन. शिंदे, बहि:शाल केंद्र कार्यवाह डॉ. संदीप कांबळे, प्रा. के. व्ही. अडसूळ, प्रा. राजेंद्र आठवले, प्रा. दीप्ती पेठे, प्रा. सत्यम सानप, प्रा. मधुकर देशमुख, प्रा. स्मिता भेगडे, प्रा. सोनल चव्हाण, प्रा. विद्या भेगडे, प्रा. दिगंबर मोहोळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. के. मलघे होते.वारे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य हा संविधानाचा गाभा आहे. संविधानातील ‘संधीची समानता’ हा शब्द स्वातंत्र्याची जाणीव या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विरोधकांचा तर्क लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवावी लागते. स्वातंत्र्यामुळेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. आज व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येताना दिसत आहे. स्वातंत्र्याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. माणसाला समाज वाचता आला, तर काहीही अशक्य नाही. ’’डॉ. भौमिक देशमुख यांनी ‘आदिवासींच्या स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावर विचार व्यक्त केले.प्राचार्य डॉ. बाळसराफ यांनी स्वातंत्र्याची जाणीव, संकल्पना आणि स्वरूप या विषयाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर आभार उपप्राचार्य डॉ. मलघे यांनी मानले.आदिवासी समाज या देशातला पहिला निवासी समाज आहे. या समाजाने समाजसुधारणेसाठी कायमच मोठे योगदान दिले आहे. आदिवासी लोकांची मानसिकता कायम स्वातंत्र्यप्रेमी राहिली आहे. स्वातंत्र्याच्या कामी आदिवासींची भूमिका निर्णायक राहिली आहे. या समाजाबद्दल म्हणावे तितके लेखन झालेले नाही. याविषयी अधिक संशोधन व लेखन होण्याची आवश्यकता आहे.- डॉ. भौमिक देशमुखआरक्षणाविषयीचे फक्त नियम बनवून चालत नाहीत, तर ते अमलातही आणण्याची आवश्यकता आहे. संविधान हे एक मूल्यव्यवस्था देणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, फक्त संसद, फक्त न्यायालय, फक्त कायदा नागरिकांना मूलभूत हक्कांची शाश्वती देऊ शकत नाही. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेचे व्यवस्थित आकलन करून घेतले पाहिजे.- प्रा. सुभाष वारे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड