Pune | पतीला शोधण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 19:15 IST2023-02-07T19:14:04+5:302023-02-07T19:15:14+5:30

शिवीगाळ करत मारहाण करून फिर्यादीचा विनयभंग...

woman who went to find her husband was beaten and molested | Pune | पतीला शोधण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून विनयभंग

Pune | पतीला शोधण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून विनयभंग

पिंपरी : पतीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री दीडच्या सुमारास आदर्शनगर, किवळे येथे घडली. या प्रकरणी महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अमित गजानन वानरे (वय ३२, रा. आदर्शनगर) सुलतान युसूफ खान (वय २७, रा. देहुरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती उशीरापर्यंत घरी न आल्याने फिर्यादी त्यांना शोधण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपी गजानन याने फिर्यादीची छेड काढत गैरवर्तन करून विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीचा पती तेथे आला. आरोपीने त्याला देखील मारहाण केली. फिर्यादी यांनी पोलिसांनी फोन करण्यासाठी फोन काढला असता आरोपीने फोन हिसकावून घेत रस्त्यावर आपटून नुकसान केले. तसेच आरोपीने सुलतान खान यास फोन करून बोलवून घेतले. आरोपी सुलतान याने तेथे आल्यानंतर फिर्यादीस मी गावावाला आहे तू काय करणार, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण करून फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: woman who went to find her husband was beaten and molested