पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाने उडवले, महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:12 AM2024-02-05T10:12:42+5:302024-02-05T10:15:05+5:30

पिंपरी : रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला पिकअपची धडक बसली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. पुणे -नाशिक महामार्गावर, मोशी येथे ...

Woman killed by vehicle while crossing road on Pune-Nashik highway | पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाने उडवले, महिलेचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाने उडवले, महिलेचा मृत्यू

पिंपरी : रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला पिकअपची धडक बसली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. पुणे-नाशिक महामार्गावर, मोशी येथे शुक्रवारी (दि. २) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

धोंडाबाई बाबू खरात (६१, रा. आदर्शनगर, मोशी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दीपक बाबू खरात (३४) यांनी शनिवारी (दि. ३) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खरात यांची आई धोंडाबाई पुणे-नाशिक महामार्गावर आदर्शनगर येथे पीएमपी बस थांब्याजवळ रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भोसरीकडून मोशीच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील पिकअपने धोंडाबाई यांना जोरात धडक दिली. यामध्ये धोंडाबाई खरात गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Woman killed by vehicle while crossing road on Pune-Nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.