पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:11 IST2025-06-06T14:09:46+5:302025-06-06T14:11:05+5:30
- मोबाइल क्रमांकधारक, बँक खातेधारक, खातेदार भारत इंटरप्रायजेस यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक
पिंपरी : फेडेक्सच्या नावे कॉल करून पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेला धमकावत तिच्या नावाने २० लाखांचे कर्ज काढले. त्यातून पैसे हस्तांतरीत करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मोबाइल क्रमांकधारक, बँक खातेधारक, खातेदार भारत इंटरप्रायजेस यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. देहूरोड, मामुर्डी येथील एका महिलेने याबाबत बुधवारी (दि. ४) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर २०२४ ते ४ जून २०२५ दरम्यान, संशयिताने फेडेक्स कस्टमर केअरच्या नावाने कॉल करून फिर्यादीचे पार्सल इराणमध्ये जात असताना अडवले असल्याची माहिती दिली. या पार्सलमध्ये अमली पदार्थ असून, सरकारी अधिकाऱ्यांची नावे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या मोबाइलवरून आयसीआयसीआय बँकेचे २० लाखांचे कर्ज काढून ते पैसे एसबीआय बँकेत ट्रान्सफर करायला लावले.