बिल्डरला जागा न देण्याच्या कारणावरून सहा जणांकडून महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:08 AM2021-06-21T11:08:33+5:302021-06-21T11:08:49+5:30

पिंपरीतील किवळेत घडलेली घटना, सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल

Woman beaten by six men for not giving space to builder | बिल्डरला जागा न देण्याच्या कारणावरून सहा जणांकडून महिलेला मारहाण

बिल्डरला जागा न देण्याच्या कारणावरून सहा जणांकडून महिलेला मारहाण

Next
ठळक मुद्देमहिलेचा विनयभंग करत त्यांच्या मुलांनाही शिवीगाळ करून मारहाण केली

पिंपरी: जागा बिल्डरला देत नाही. या कारणावरून सहा जणांनी घरात घुसून मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किवळे येथे रविवारी ही घटना घडली. महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर मनोहर तरस, बाळू तरस, संजय तरस, सागर तरस, साहिल तरस, अजय धिडे, अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला राहत असलेली जागा बिल्डरला देत नाहीत, या कारणावरून आरोपी त्यांच्या घरात घुसले. त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून त्यांनी महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या मुलांना शिवीगाळ करून मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Woman beaten by six men for not giving space to builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app