शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

हातगाड्यांना अभय कोणाचे?

By admin | Updated: July 8, 2015 02:17 IST

शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी : हा येथील मुख्य चौक असून, येथून रावेत मार्ग अनेक वाहने द्रुतगती मार्गाकडे जाण्या-येण्याकरिता वापर करतात

रावेत : शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी : हा येथील मुख्य चौक असून, येथून रावेत मार्ग अनेक वाहने द्रुतगती मार्गाकडे जाण्या-येण्याकरिता वापर करतात. त्यामुळे येथे नेहमी वाहनांची गर्दी असते. रस्त्यावर भाजीविक्रेते हातगाड्या बिनधास्तपणे उभ्या करतात. त्यामुळे येथे नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो. येथेच पालिकेची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची सतत गर्दी असते. विक्रेत्यांची दादागिरीगुरुद्वारा चौक : हा चौक नेहमी गजबजलेला असतो. चौकातून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे आणि वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक व्यावसायिक हातगाड्या उभ्या करून रस्ता अडवतात. भाजीविक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंस अतिक्रमण केल्यामुळे रस्ता कोठे आहे, याचा शोध वाहनचालक व नागरिकांना घ्यावा लागतो. गुरुद्वारा चौक ते वाल्हेकरवाडी हा मार्ग रस्ता दुभाजकामुळे अरुंद झाला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या उभ्या असल्यामुळे रस्ता शोधणेसुद्धा नागरिकांना शक्य होत नाही. काही वेळा नागरिक या विक्रेत्यांना विनंती करण्यास गेल्यावर न ऐकता विक्रेते नागरिकासोबत हुज्जत घालतात.स्पाइन रोड बिजलीनगर : वाहतुकीचा परिसरातील सर्वांत मोठा मार्ग म्हणून या मार्गाची ओळख आहे. या मार्गावर रेलविहार वसाहतीलगत असणाऱ्या मुख्य चौकात नेहमी नागरिक आणि वाहनांची गर्दी असते. येथून अनेक विद्यार्थी परिसरातील अनेक विद्यालयांत ये-जा करीत असतात. चौकालगतच अनेक व्यावसायिकांनी हातगाड्या उभ्या केल्या आहेत. वाहतुकीचा नेहमी खोळंबा होतो. अशीच परिस्थिती आकुर्डी रेल्वे स्टेशन आणि डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलालगत पाहावयास मिळते. पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यास अतिक्रमण विभाग काही तासापुरती कारवाई करते. पुन्हा काही वेळाने परिसरात जैसे थे परिस्थिती पाहावयास मिळते. तरी, पालिका प्रशासनाने या व्यावसायिकांवर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.आम्ही पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा प्रशासन यांच्यावर कारवाई करीत नाही व पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे परिसरातील सर्वच मुख्य चौक व मार्गावर हातगाड्यांची संख्या दिवसेन्दिवस वाढत चालली आहे. बिनधास्तपणे विक्रेते हातगाडे रस्त्यावर लावतात. अशा सर्व हातगाड्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी, अशी मागणी वाहतूक सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)