शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पवना धरण शंभर टक्के भरले म्हणून काय झाले; पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआडच पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 8:35 PM

धरण भरलेले असले तरीदेखील पाणी कपातीपासून शहरवासीयांची सुटका नाही.

ठळक मुद्देजूनपासून धरण क्षेत्रात १६८४ मिली मीटर पावसाची नोंद

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र दिवसाला पाणीपुरवठा नियमित केला जाणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. ३० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत नाही, तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.  

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिली होती. जून, जुलैमध्ये धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता.  त्यामुळे पाण्याचे संकट वाढण्याची चिन्हे होती. ऑगस्टमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑगस्टअखेर पवना धरण शंभर टक्के भरले. जूनपासून धरण क्षेत्रात १६८४ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर ६७.१३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली. आज धरणात ९९.७० टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ३८७० मिलीमीटर पाऊस झाला होता.  .................. धरण भरले असले. दहा महिन्यापासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. पाणी कतापीपासून शहरवासीयांची सुटका नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत  नोव्हेंबर २०१९ पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. धरण १०० टक्के भरल्यानंतरही पाणी कपात कायम राहणार आहे. वाढीव पाणी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ......... 

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, ''धरणात ९९.७० टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. पिंपरी- चिंचवडसाठी बाराशे क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाणी कमी होत आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस थांबला असला तरी धरणात पाणी साठा कमी होत नाही.'

 ............ पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे म्हणाले, ''पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. पालिका नदीतून पाणी उचलत आहे. शहरासाठी महिन्याला ११टक्के पाणी लागते. त्यानुसार १५ जुलै २०२१ पर्यंत धरणातील पाणीसाठापुरेल.   ................... पाणी साठाजूनपासून झालेला पाऊस १६८४ मिली मीटर गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस  ३८१७ मिली मीटर धरणातील सध्याचा पाणीसाठा ९९.७० टक्के गेल्या वर्षी आज पाणीसाठा १०० टक्के जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ ६४.७१ टक्के

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीpavana nagarपवनानगरDamधरणRainपाऊस