'रॉंग साईड'ने येणाऱ्यांनो सावधान :पोलिसांच्या कारवाईला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 02:35 PM2019-01-07T14:35:35+5:302019-01-07T14:37:29+5:30

उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांना  शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे.

Warning People coming to the ' Wrong Road Side' | 'रॉंग साईड'ने येणाऱ्यांनो सावधान :पोलिसांच्या कारवाईला सुरुवात 

'रॉंग साईड'ने येणाऱ्यांनो सावधान :पोलिसांच्या कारवाईला सुरुवात 

Next

पिंपरी : उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांना  शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. उलट दिशेने वाहन चालविणाºया वाहनचालकांवर चौका-चौकांत, तसेच अंतर्गत रस्त्यांवर कारवाई सुरू आहे. पोलीस आयुक्तालय परिमंडल एकच्या हद्दीत २९ वाहनचालकांवर तर परिमंडल दोनच्या हद्दीत ३२ वाहनचालकांवर अशी एकुण ६१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 
            वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघाताला आमंत्रण देणारे, स्वत:सह दुसऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणारे वाहनचालक शहरात ठिकठिकाणी दिसून येतात. वेळोवेळी सूचना दिल्या, जनजागृती केली. परंतू उलट दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तणुकीवर काही फरक दिसुन आलेला नाही. बेश्स्ति वाहन चालकांना शिस्त लागावी,यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परमिंडल एकच्या हद्दीत पिंपरीत ६, निगडीत १, भोसरीत २ आणि चाकण येथे २० अशा एकुण २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडल दोनच्या हद्दीत देहुरोडमध्ये ३, किवळेत ३, चिखलीत ३, तळेगाव दाभाडे येथे ५, वाकडला १८ अशा एकुण ३२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 
            पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी कारवाईची तीव्र मोहीम राबविण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच पोलिसांकरिता त्यांनी बक्षीस योजनासुद्धा जाहीर केली आहे. विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणाऱ्यांस  पकडल्यानंतर १०० रुपये, चारचाकी मोटारचालकास पकडल्यास ५०० रुपये अशा स्वरुपाची ही बक्षीस योजना आहे. योजना जाहीर केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस आणखी कार्यतत्पर झाले आहेत. प्रमुख रस्त्यांवर तसेच वर्दळीच्या ठिकाणच्या रस्त्यांवर उलट दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनापकडून कारवाई करण्यास पोलीस सज्ज झाले आहेत. रोज प्रमुख चौकांमध्ये सुमारे वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. 

Web Title: Warning People coming to the ' Wrong Road Side'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.