शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Vidhan Sabha 2019 : पुण्यानंतर पिंपरीत कोणाचे तिकीट कापणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 8:23 PM

भारतीय जनता पक्षाने पुण्यातील तीन विद्यमान आमदारांची तिकीटे कापली असून पिंपरी-चिंचवडमधील कोणाचे तिकीट कापणार?याकडे सर्वांचे लक्ष आहे ..

पिंपरी : भारतीय जनता पक्षाने पुण्यातील तीन विद्यमान आमदारांची तिकीटे कापली असून पिंपरी-चिंचवडमधील कोणाचे तिकीट कापणार? कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असणाºयांनी धास्ती घेतली आहे. तर शिवसेनेची वाट धरणाऱ्यांचे मनसुभे धुळीस मिळाले आहेत. विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसांपर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी व शहरालगत मावळ असे विधानसभेचे चार मतदार संघ आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी कोणता मतदार संघ कोणास याबाबत निर्णय झालेला नाही. काँग्रेसनेही एक जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. तर राष्टÑवादीने तीनही मतदार संघ राष्ट्रवादीला मिळाल्याचे जाहिर केले आहे. पिंपरीवर आरपीआय आठवले गटानेही दावा केला आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहिर केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.  

शिवसेनेची वाट धरणाऱ्याची लागली वाटशिवसेना भाजपाची युती होणार की नाही? याबाबत उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. मात्र, यावर आज पडदा पडला आहे. महायुतीची घोषणा झाल्याने अनेकांच्या पक्षांतर करणाऱ्यांच्या मनसुभ्यांवर पाणी फेरले आहे. भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदार संघांवर शिवसेनेने दावा केला होता. तर गेल्या काही दिवसांपासून पिंपरीवरही भाजपाने दावा केला होता. महायुती फिस्कटली तर भाजपाकडून कोण आणि शिवसेनेकडून कोण अशी तयारी पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांनी केली होती. तीनही मतदार संघात दोन्ही पक्षांचे स्वतंत्र उमेदवार उभे करता येऊ शकतात, अशी तयारीही दोन्ही पक्षांनी केली होती. अनेकांनी मुख्यमंत्री तसेच मातोश्रीची वारीही केली होती. मात्र, युतीची घोषणा झाल्याने शिवसेनेकडून लढणाऱ्यांची वाट लागली आहे. आघाडीचेही घोंगडे भिजत पडले आहे.   

विद्यमानांना संधी की पत्ता कटणार? भोसरीत भाजपा संलग्न आमदार महेश लांडगे, पिंंपरीत शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार, चिंचवडला भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मावळात भाजपाचे आमदार बाळा भेगडे आहेत. पुण्यात विद्यमान तीन आमदारांचा पत्ता कट केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काय होणार? याबाबत उत्सुकता आहे. विद्यमानांना संधी मिळणार? की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे नेत्यांनी धसका घेतला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण