दरोडेखोरांनी पोलिसांच्याच अंगावर घातल्या गाड्या; तरीही जिवाची पर्वा न करता ६ आरोपींना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 04:04 PM2022-01-20T16:04:22+5:302022-01-20T16:04:32+5:30

पोलिसांनी जिवाची पर्वा न करता सहा आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. तसेच तीन ते चार जण डोंगरामध्ये पळून गेले

Vehicles driven by robbers on police 6 accused arrested without regard to life | दरोडेखोरांनी पोलिसांच्याच अंगावर घातल्या गाड्या; तरीही जिवाची पर्वा न करता ६ आरोपींना पकडले

दरोडेखोरांनी पोलिसांच्याच अंगावर घातल्या गाड्या; तरीही जिवाची पर्वा न करता ६ आरोपींना पकडले

Next

पिंपरी : दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्या. यात एक पोलीस जखमी झाला. मावळ तालुक्यातील उर्से टोलनाका येथे गुरुवारी (दि. २०) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन वाहनांमधून महामार्गावर जाणार असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला. टोलनाक्यावरून जात असलेल्या संशयित वाहनाला अडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. तरीही पोलिसांनी जिवाची पर्वा न करता सहा आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. तसेच तीन ते चार जण डोंगरामध्ये पळून गेले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

Web Title: Vehicles driven by robbers on police 6 accused arrested without regard to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.