शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पिंपरी-चिंचवड शहरात वाहने तब्बल २० लाख; वाहतूक पोलीस केवळ ३९८!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 4:15 PM

शहरातील वाहतूक नियमन करताना पोलिसांना करावी लागत आहे कसरत..

ठळक मुद्देपूर्णवेळ अधिकारीच नाही : अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण

नारायण बडगुजर

पिंपरी : उद्योगनगरी म्हणून नावारुपास आलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ ४८१ चौरस किलोमीटर आहे. यात २२५२ किलोमीटरचे रस्ते, महत्त्वाचे १५० चौक आहेत. या चौकांत व रस्त्यांवर वाहतूक नियमनासाठी १०० सिग्नल आहेत. तसेच शहरात १५ उड्डाणपूल असून २० लाखांवर वाहने आहेत. शहरात १० वाहतूक विभाग असून, ३८ ठिकाणे वाहतूक कोंडीची आहेत. मात्र या सर्वांचा भार ३९८ वाहतूक पोलिसांवर आहे. त्यामुळे वाहतूक नियमन करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. 

पिंपरी - चिंचवड आयुक्तालय १५ आॅगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. त्यावेळी शहरासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग अस्तित्वात आला. एक पोलीस उपायूक्त, एक सहायक पोलीस आयुक्त, नियोजनासाठी एक वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि ३९८ कर्मचारी या विभागासाठी नियुक्त आहेत. तसेच महापालिकेकडून १४० वॉर्डन वाहतूक विभागाला देण्यात आले. आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त यांच्याकडे वाहतूक विभागाचा पदभार आहे. वाहतूक विभागासह प्रशासन, अस्थापना, गुन्हे अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. परिणामी त्यांना वाहतूक विभागासाठी पूर्णवेळ देता येत नाही. 

वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त निलिमा जाधव निवृत्त झाल्या. त्यानंतर त्यांच्या जागी अद्यापही पूर्णवेळ अधिकारी नेमला गेला नाही. त्याचप्रमाणे वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या नियोजनाची जबाबदारी संभाळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांची काही दिवसांपूर्वी आयुक्तालयाच्या विशेष शाखेत बदली झाली. मात्र, त्यांच्याही जागी अधिकारी नियुक्त न झाल्याने विशेष शाखेसह वाहतूक विभागाचीही जबाबदारी गोकुळे यांच्याकडेच आहे. सांगवी, हिंजवडी, निगडी, चिंचवड, पिंपरी, भोसरी, चाकण, दिघी - आळंदी, देहूरोड-तळेगाव, तळवडे अशा दहा वाहतूक विभागांसह वाहतूक नियंत्रण कक्ष असे अकरा विभाग सध्या अस्तित्वात आहेत. यातील पिंपरी विभाग शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीचा आहे. मात्र या विभागाला अधिकारी नाही.

 

पोलीस आयुक्तालयाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ नाही. काही टप्प्यांमध्ये ते उपलब्ध होईल. वाहतूक विभागातील काही अधिकाऱ्यांची बदली झाली. तर काही निवृत्त झाले. त्यामुळे या विभागाला पूर्णवेळ उपायुक्त व सहायक आयुक्त उपलब्ध होण्याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच नवीन अधिकारी उपलब्ध होतील.

- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

 

पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक विभाग - 10

वाहतूक कोंडीची ठिकाणे - 38

ब्लॅक स्पॉट - 18

 

पोलीस आयुक्तालयहद्दीतून जाणारे महामार्ग

महामार्ग किमी

पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक 60 - 29 (नाशिक फाटा ते भाम नदी, चाकण)

जुना पुणे-मुंबई महामार्ग क्रमांक 48 - 29 (बापोडी हॅरिस पूल ते तळेगाव दाभाडे)

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 4 - ३५ (चांदणी चौक ते उर्से टोलनाका)

 

नो पार्किंग झोन ६७

पी-1/पी-2 २९

अवजड वाहने प्रवेश बंद 24

एकेरी वाहतूक 6

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर