शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच : विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 15:20 IST

शहरात विविध भागातून एका महागड्या सायकलसह तीन दुचाकींची चोरी झाली...

ठळक मुद्देएका सायकलसह तीन दुचाकींची चोरी

पिंपरी : वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरात विविध भागातून एका महागड्या सायकलसह तीन दुचाकींची चोरी झाली. या प्रकरणी मंगळवारी (दि. २४) चिंचवड, निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकल चोरीचा प्रकार वाल्हेकरवाडी येथे घडला. याप्रकरणी श्रेयस व्ही. जैन (वय २१, रा. वाल्हेकरवाडी) यांनी मंगळवारी (दि. २४) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी त्यांची २१ गिअर आणि डीस्कब्रेक असलेली १२ हजार रुपयांची सायकल इमारतीच्या पार्किंगमध्ये हॅन्डल लॉक करून ठेवली होती. चोरट्यांनी दि. ८ ऑगस्ट रोजी सायकल चोरून नेली. दुचाकी चोरीबाबत संतोष मुरलीधर सुतार (वय ४०, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ सप्टेबर रोजी दुपारी तीन ते रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली. सुतार यांनी ४० हजार रुपये किमतीची दुचाकी निगडी येथील मॉलच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. चिंचवड स्टेशन येथील एका दुकानासमोरून दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते १८ सप्टेबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी झाली. याप्रकरणी आकाश बाळू पालखे (वय २७, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) यानी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखलीच्या घरकुल येथे सोसायटीच्या पार्किंगमधून शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी केली आहे. याप्रकरणी रियासत गुलाब शेख (वय २७, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीThiefचोरtheftचोरी