हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 20:05 IST2025-05-22T20:04:48+5:302025-05-22T20:05:13+5:30

हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असून, त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही.

Vaishnavi Hagawane Death Case Hagavane family is my distant relative; Vaishnavi's maternal uncle IG Jalindar Supekar takes sides | हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू

हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू

-किरण शिंदे

पुणे :
पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणेमृत्यू प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचेही नाव घेण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबर पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत. दमानियांनी त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर सुपेकरांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.

जालिंदर सुपेकर नावाचे ते मुलाचे (शशांक हगवणकर) मामा आहे. त्यांचा धाक दाखवून त्यांच्यावर (सूनांवर) बरंचस काही करायचे. त्यांच्या कुटुंबांना धाक दाखवायचे. त्या दोन्ही मुलींना धाक दाखवायचे. असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या आरोपांवर डॉ. जालिंदर सुपेकर ( विशेष पोलीस महानिरीक्षक) यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सुपेकर म्हणाले, हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असून, त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. त्यासोबतच गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झाला नाही. मलाही दोन मुली असून, अशा गंभीर अन निर्घृण कृत्याचे समर्थन कोणताही बाप करूच शकत नाही. आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्हायलाच हवी, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

तत्पूर्वी, मयुरीने (राजेंद्र हगवणेच्या मोठ्या मुलाची पत्नी) जेव्हा तक्रार केली होती, तेव्हा तक्रारीवर सुद्धा हे लोक फरार होते. मग परत आले. त्यांना (मयुरीच्या कुटुंबाला)धमकावण्यात आलं की तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की, जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी अंजली दमानियांनी गंभीर आरोप करताना केली. त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सुपेकर यांचे नाव घेत आरोप केला आहे. सुपेकर हे त्यांचे (शशांक हगवणेचा) मामा आहेत. केलं सुपेकराचं. घेणं न देणं त्रास दिला", असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

Web Title: Vaishnavi Hagawane Death Case Hagavane family is my distant relative; Vaishnavi's maternal uncle IG Jalindar Supekar takes sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.