शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवांना गोडी पालखी सोहळ्याची

By admin | Updated: July 8, 2015 02:15 IST

तुकोबारायांच्या पादुका, सव्वातीनशे दिंड्या आणि मोठ्या लवाजम्यासह आषाढी वारीसाठी पंढरीला जाणारा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. सुरुवातीला निवडक असलेल्या दिंड्या आता सव्वातीनशेवर पोहोचल्या असून,

मंगेश पांडे  पिंपरीतुकोबारायांच्या पादुका, सव्वातीनशे दिंड्या आणि मोठ्या लवाजम्यासह आषाढी वारीसाठी पंढरीला जाणारा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. सुरुवातीला निवडक असलेल्या दिंड्या आता सव्वातीनशेवर पोहोचल्या असून, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही दिंड्या सहभागी होत आहेत. पालखी सोहळ्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील भाविक सोहळ्यात सहभागी होत आहेत. काही जण दिंडीच्या माध्यमातून, तर काही जण वैयक्तिकरीत्या सोहळ्यात सहभाग नोंदवीत आहेत. यंदाच्या वर्षी सोहळ्यात ३२६ दिंड्या असतील. तुकोबारांच्या पालखी सोहळ्यात सुरुवातीपासून देहूकर फडातील दिंड्या होत्या. या दिंड्या वंशपरंपरेने चालत आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पानथूरकर दिंडी, धोंडोपंतदादा दिंडी, माई दिंडी, गिरिजा टेंभूकर दिंडी, पैठणकर दिंडी, केसरीकर दिंडी, देशमुख दिंडी, पाथवडकर दिंडी या दिंडींचा समावेश आहे. पालखी सोहळ्यातील मार्गावर याच दिंडीचे कीर्तन सोहळाप्रमुखांच्या सूचनेनुसार होत असतात. या दिंडी रथाच्या पुढे आणि मागे चालतात. अनेक गावांच्या दिंड्या आल्यावर तयार होतो, त्याला फड असे म्हणतात. हा फड चालविणारे असतात. त्यांना श्रीगुरू संबोधले जाते. पूर्वी केवळ फडातीलच दिंड्या असायच्या. कालांतराने सोहळा वाढत गेला. इतरही गावागावांतून दिंड्या सोहळ्यात सहभागी होऊ लागल्या. त्यामुळे सोहळ्यालाही भव्य स्वरूप प्राप्त झाले. आता लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होत आहेत. दर वर्षी दिंड्यांची संख्या वाढतच गेली. २००१ ला सोहळ्यात सुमारे सव्वादोनशे दिंड्या होत्या. २०१० ला पावणेतीनशे दिंड्या झाल्या. हा आकडा २०१३ ला सव्वातीनशेपर्यंत पोहोचला. सोहळ्यातील दिंडी म्हणजे भाविकांसाठी एक कुटुंबच असते. यामध्ये वीणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, तुळस डोक्यावर घेतलेली महिला, पाण्याचा हंडा घेतलेली महिला असते. पालखी तळाच्या ठिकाणीच दिंडीचा मुक्काम असून, यासाठी तंबूंची व्यवस्था केलेली असते. दिंडी म्हणजे एक शिस्तबद्ध संचच असतो. ठरावीक ठिकाणांशिवाय तो इतरत्र कोठेही थांबत नाहीत. सध्या नागरिकांकडे कामाच्या व्यापाने वेळ नसला, तरी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे. त्यामुळे एकदा या सोहळ्यात सहभागी झालेल्याला जणू या सोहळ्याची ओढच लागते. सध्याच्या नागरिकांकडे कामाच्या व्यापाने वेळ नसला, तरी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे. त्यामुळे एकदा या सोहळ्यात सहभागी झालेल्या नागरिकाला जणू या सोहळ्याची ओढच लागते. तुकोबारायांची वारी ही केवळ राज्यापुरती न राहता देशाबाहेरही पोहोचली आहे. सध्या सोहळ्यात कर्नाटकातील माई दिंडीसह बेळगावकर, बहिलोहोंगल येथीलही पाच दिंड्या आहेत.