Unknown person death in train accident at kamshet | कामशेत येथे रेल्वेच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू
कामशेत येथे रेल्वेच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

कामशेत : पुणे- मुंबई लोहमार्गावर लोणावळा पुणे लोकलची धडक बसुन झालेल्या अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला आहे.रेल्वेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार ( दि. २६ ) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कामशेत शहराच्या हद्दीत लोणावळ्याहुन पुण्याकडे जाणाऱ्या लोकलची धडक बसुन एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला आहे. या व्यक्तीने अंगात पांढऱ्या बाहीचा फुल शर्ट राखाडी पॅन्ट घातली असुन कंबरेला काळ्या रंगाचा पट्टा घातला आहे. याची उंची ५ फुट ५ इंच असुन हा अंगाने मध्यम व रंगाने काळा सावळा आहे. याप्रकरणी पुढील तपास लोहमार्ग पोलीस हवालदार संजय तोडमल करत आहेत.

Web Title: Unknown person death in train accident at kamshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.