शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम सुरूच

By admin | Updated: September 15, 2016 01:28 IST

एमआयडीसीने महापालिकेकडे वर्ग केलेल्या चिंचवडच्या संभाजीनगर येथील भूखंडावर महापालिकेने साई उद्यान विकसित केले आहे.

पिंपरी : एमआयडीसीने महापालिकेकडे वर्ग केलेल्या चिंचवडच्या संभाजीनगर येथील भूखंडावर महापालिकेने साई उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात महापालिकेने अनधिकृत बांधकाम केले आहे. अनधिकृत बांधकाम हटवावे, अशी नोटीस एमआयडीसीने महापालिकेला बजावली; मात्र तरीही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आणि बांधकाम हटविले नाही. त्याही पुढे जात महापालिकेने आता साई उद्यानात अनधिकृत बांधकाम पुन्हा सुरू केले आहे. ते त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. थोरात म्हणाले, ‘‘एमआयडीसीने त्यांच्याकडील मोकळे भूखंड महापालिकेकडे वर्ग केले आहेत. संभाजीनगर, चिंचवड येथील २५ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली मोकळी जागा क्रमांक एक हा भूखंड ९ मे १९८५ला महापालिकेकडे हस्तांतरित केला होता. एमआयडीसीच्या या भूखंडावर महापालिकेने साई उद्यान विकसित केले. त्यानंतर येथे व्यायामशाळा, योग केंद्र, मंदिर, माळी हाऊस, स्वच्छतागृह आदी बांधकामांचे नकाशे मंजुरीसाठी महापालिकेकडून अर्ज सादर केला. त्यानंतर डिसेंबर २०१५ला एमआयडीसीकडे हा अर्ज सादर केला. एकूण २३०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामांचे हे नकाशे महापालिकेने तयार केले आहेत. ही बांधकामे महापालिकेने एका महिन्याच्या आत हटविण्यात यावेत, अशी नोटीसही एमआयडीसीने जून २०१५ रोजी बजावली आहे. त्यानंतरही या मोकळ्या जागेवर व्यायामशाळा, योग केंद्र आणि वाचनालयासाठी बांधकाम परवानगी मिळावी म्हणून महापालिकेने एमआयडीसीकडे आॅनलाइन अर्ज सादर केला. संबंधित बांधकामासाठीची सामासिक अंतरे एमआयडीसीच्या सुधारित बांधकाम नियंत्रण नियमावलीत नसल्याचे पालिकेला कळविले. रीतसर परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करण्यात आली. बांधकाम हटवावे, अशी नोटीस एमआयडीसीकडून देण्यात आली होती; मात्र तरीही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले.’’ (प्रतिनिधी)