भोसरी एमआयडीसी,चाकण आणि पिंपरीतून दुचाकी चोरीला; गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 20:24 IST2021-08-03T20:24:02+5:302021-08-03T20:24:13+5:30

अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Two-wheeler stolen from Bhosari MIDC, Chakan and Pimpri; Crime filed | भोसरी एमआयडीसी,चाकण आणि पिंपरीतून दुचाकी चोरीला; गुन्हे दाखल

भोसरी एमआयडीसी,चाकण आणि पिंपरीतून दुचाकी चोरीला; गुन्हे दाखल

पिंपरी : भोसरी एमआयडीसी, चाकण आणि पिंपरी परिसरातून तीन दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. याबाबत सोमवारी (दि. ०२) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतामण संभाजी हांडे (वय ६४, रा. सेंट्रल मॉलच्या पाठीमागे, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हांडे यांनी त्यांची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम एच १४/ ई बी११८८) रविवारी रात्री साडेआठ वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी सकाळी पाच वाजता उघडकीस आला. 

अरुण शिवाजी राठोड (वय ४०, रा. निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राठोड यांनी त्यांची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम एच २८/ बी सी २०८८) घरासमोरील पार्किंगच्या आवारात हँडल लॉक करून पार्क केली. शनिवारी रात्री आठ ते रविवारी सकाळी सात या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीचे लाॅक तोडून दुचाकी चोरून नेली. 

साईनाथ संजय पवार (वय २६, रा. जय गणेश साम्राज्य सोसायटी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवार यांनी त्यांची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच १२ / क्यू सी ३१८५) एमआयडीसी भोसरी मध्ये पेंटॅगॉन अॅस्मली अॅंड ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार २६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडला. संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler stolen from Bhosari MIDC, Chakan and Pimpri; Crime filed