दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तरुणाचा मृत्यू; देहूरोड परिसरात अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:27 IST2023-11-17T13:26:30+5:302023-11-17T13:27:17+5:30

आशितोष वसंतराव हिरे (वय २५, रा. किवळेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे....

Two-wheeler head-on collision, youth dies; Accident in Dehur Road area | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तरुणाचा मृत्यू; देहूरोड परिसरात अपघात

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तरुणाचा मृत्यू; देहूरोड परिसरात अपघात

पिंपरी : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना देहूरोड येथील विकासनगर येथे ७ नोव्हेंबर रोजी घडली. आशितोष वसंतराव हिरे (वय २५, रा. किवळेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

महेश विठ्ठल चव्हाण (रा. किवळेगाव) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल अरुण नलावडे (वय ३५, रा. देहूरोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मेहुणा आशितोष हिरे त्याच्या दुचाकीवरून विकासनगर येथून घराकडे येत होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या अतुलने दुचाकीने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन आशितोषचा मृत्यू झाला. देहूरोड पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Two-wheeler head-on collision, youth dies; Accident in Dehur Road area