ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 20:03 IST2019-01-14T20:00:57+5:302019-01-14T20:03:05+5:30

तळेगाव -चाकण रस्त्यावरील तळेगाव स्टेशन येथे मल्टीऍक्सल ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

Two-wheeler driver killed on the spot in accident |  ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार 

 ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार 

तळेगाव दाभाडे : तळेगाव -चाकण रस्त्यावरील तळेगाव स्टेशन येथे मल्टीऍक्सल ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास झाला.वाढत्या अपघातामुळे तळेगाव स्टेशन चौक हा मृत्युचा सापळा बनला आहे. संजय भीमराव पवार (वय२९,रा. जातेगाव, जि.बीड\ सध्या मुक्काम वडगाव, ता.मावळ, जि.पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. 


              तळेगाव - चाकण रस्त्यावर सकाळी ७ते सायंकाळी ७ या दरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी असतानाही प्रवेश बंदी तोडून आलेल्या वाहनाने एकाचा हकनाक बळी घेतला  आहे. ,यामुळे वडगाव ग्रामीण पोलिसांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.पोलिसांचा हलगर्जीपणा आणि 'अर्थ'कारणामुळे एका वाहनचालकास  आपला हकनाक जीव गमवावा लागला असल्याची  नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सकाळी ११ च्या सुमारास तळेगाव स्टेशन येथे संजय पवार दुचाकीवरून  (एमएच २३ एएल१०८५) जात असताना वडगाव फाट्यावरून चाकणच्या दिशेने नो एंट्री तोडून जाणाऱ्या  मल्टीऍक्सल ट्रकची (एच एम ०६ बीडी७०९) धडक  दुचाकीला बसली.यामध्ये पवार यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. संजय पवार हे टाकवे येथील वॅरॉक कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता.
 

Web Title: Two-wheeler driver killed on the spot in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.