दिघीत दोन गटांत हाणामारी, २२ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 05:01 AM2017-09-17T05:01:22+5:302017-09-17T05:01:35+5:30

मारहाण का केली याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटांत दिघीतील यमाईनगर येथे रात्री सव्वा आठच्या सुमारास हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील २२ लोकांवर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Two groups clash, 22 cases filed against them in police | दिघीत दोन गटांत हाणामारी, २२ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

दिघीत दोन गटांत हाणामारी, २२ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Next

पिपंरी : मारहाण का केली याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटांत दिघीतील यमाईनगर येथे रात्री सव्वा आठच्या सुमारास हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील २२ लोकांवर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश नाईकवाडे (वय २०, रा. गुरुदत्त कॉलनी, दिघी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नरहरी साकोरे (वय ४५, रा. श्रमिकनगर, दिघी) अनिता साकोरे, नितीन साकोरे, गौरव साकोरे, माऊली बोराटे व इतर चार जण (सर्व रा. दिघी) यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नरहरी साकोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विजय कदम, सुदर्शन कदम, सुनंदा कदम, सायली कदम, सागर कदम व अन्य आठ सर्व राहणार दिघी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे.

Web Title: Two groups clash, 22 cases filed against them in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे