दोन कारवायांमध्ये गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक; एक किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:25 IST2025-05-09T18:24:30+5:302025-05-09T18:25:24+5:30
दोन्ही कारवायांमध्ये तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.

दोन कारवायांमध्ये गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक; एक किलो गांजा जप्त
पिंपरी : भोसरी आणि संत तुकाराम नगर येथे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ९७४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.
भोसरी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर एका ५१ वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडून २० हजार ७०० रुपये किमतीचा ४१४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ५१ वर्षीय महिलेला अटक करत तिच्यासह आणखी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई संत तुकाराम नगर पिंपरी येथे करण्यात आली. विजय लक्ष्मण साळुंखे ( वय २१, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५६० ग्रॅम गांजा आणि ८०० रुपये रोख रक्कम असा एकूण २८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. विजय हा संत तुकाराम नगर येथे गांजा विक्रीसाठी आला असता ही कारवाई करण्यात आली.