पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 14:31 IST2019-07-13T14:30:15+5:302019-07-13T14:31:46+5:30

माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले.

trying to killed of BJP women corporator by car | पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देयाप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : चारचाकी मोटारगाडी अंगावर घालून पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच नगरसेविकेचा विनयभंगही केला. निगडी येथील भक्तीशक्ती चौकात शुक्रवारी (दि. 12) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक काळे (वय 57, रा. कृष्णानगर, चिंचवड) व चारचाकी मोटारीचा अनोळखी चालक अशा दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी 47 वर्षीय पीडित नगरसेविकेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी नगरसेविका त्यांच्या पतीसह मुलीला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना निगडीतील भक्तीशक्ती चौकात त्यांच्या चारचाकी मोटारीला आरोपींनी मोटारीने कट मारला. त्यानंतर मोटार आडवी लावून फिर्यादीस मोटारीतून खाली उतरायला लावून जबरदस्तीने रस्त्यावर ढकलून दिले.माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले. तसेच आरोपी अशोक काळे याने मोटारीतून अश्लील इशारे करून 'ये, गाडी घाल त्यांच्यावर ' असे म्हणाला. त्यानंतर अनोळखी आरोपी चालकाने त्याची मोटार फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: trying to killed of BJP women corporator by car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.