Dr Babasaheb Ambedkar Jayanti: पिंपरी चौकात उद्या 'या' वेळेत वाहतुकीत बदल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:39 IST2022-04-13T19:39:18+5:302022-04-13T19:39:27+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चौकातील वाहतुकीमध्ये बदल केला आहे

Dr Babasaheb Ambedkar Jayanti: पिंपरी चौकात उद्या 'या' वेळेत वाहतुकीत बदल होणार
पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गुरुवारी (दि. १४) जयंती आहे. त्यानिमित्त पिंपरी चौकातील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. गुरुवारी दुपारी तीन ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीमधील हे बदल असणार असल्याची माहिती वाहतूक विभगाचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
चिंचवड स्टेशनकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक बंद करून डी मार्ट इनग्रेड सेपरेटरमध्ये वळविण्यात येणार आहे. नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक बंद करून डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एच. पी. पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटरमध्ये वळविण्यात येणार आहे. तसेच स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणारा मार्ग बंद करून ही वाहतूक लिंक रोडकडे वळविण्यात येणार आहे. याशिवाय नेहरुनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे येणारी वाहतूक बंद करून एच. ए. कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनीकडे वळविण्यात येत आहे. तसेच सम्राट चौक ते अहिल्यादेवी चौक पिंपरी दरम्यानचा रोड वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.