शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बंदी झुगारून पर्यटकांचा जीवाशी खेळ; कुंडमळा येथील सूचना फलकांकडे दुर्लक्ष, तरुणांचीही हुल्लडबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:40 IST

आनंदाच्या भरात आणि मोबाइलमध्ये सेल्फी, व्हिडीओ टिपण्याच्या नादात बंदीला झुगारून उत्साही पर्यटक पाण्यात उतरतात

तळेगाव दाभाडे : शेलारवाडीजवळील कुंडमळा येथील इंद्रायणीवरील साकव पूल कोसळून रविवारी मोठी दुर्घटना घडली. यात अनेक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. सुटीच्या दिवशी या भागात पर्यटक मोठी गर्दी करतात. पुलावर जाण्यास बंदी असतानाही सोशल मीडियावरील रील्स पाहून तसेच व्हिडीओ, फोटो काढण्यासाठी पुलावर जातात. हाच पूल रविवारी पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला.

इंद्रायणीनदीच्या प्रवाहामध्ये मोठे भोवरे व रांजणखळगे आहेत. येथील निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. हे टिपण्यासाठी शनिवार, रविवारी तसेच सुट्यांच्या दिवशी पर्यटक गर्दी करतात. आनंदाच्या भरात आणि मोबाइलमध्ये छायाचित्र, व्हिडीओ टिपण्याच्या नादात येथील बंदीला झुगारतात काही उत्साही पर्यटक रांजण खळग्यांमुळे पाण्यात उतरतात. सुरक्षारक्षक नसल्यास काही हुल्लडबाज तरुण वाहत्या पाण्यात उतरून जीव धोक्यात घालतात. परिसरात लावलेल्या सूचना फलकाकडे कोणीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे जीव गमावण्याची वेळ पर्यटकांवर येते.

इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ कोणी जाऊ नये. नदीच्या पाण्यात पोहण्यास उतरू नये. पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढू नये. नदीच्या प्रवाहामध्ये मोठे भोवरे व रांजणखळगे आहेत. तुमच्या घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे याची जाण असू द्या, अशा प्रशासकीय सूचनांकडे पर्यटक दुर्लक्ष करतात.

नदीपात्रात तरुण करतात मद्यपान

अनेकांना नदीपात्रात उतरून फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. परंतु या भागाची अनेक पर्यटकांना माहिती नसल्याने पाण्यात बुडण्याच्या घटना घडत असतात. काही तरुण तर नदीपात्रात मद्यपान करीत बसलेले असतात. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसतो.

टॅग्स :Puneपुणेmavalमावळriverनदीindrayaniइंद्रायणीAccidentअपघातPoliceपोलिसRainपाऊसtourismपर्यटन