‘आज फक्त काच फोडली, उद्या तुझ्या पप्पाना फोडेन’; लग्नास नकार दिल्याने तरुणीला धमकी

By नारायण बडगुजर | Updated: October 12, 2023 18:06 IST2023-10-12T18:06:00+5:302023-10-12T18:06:38+5:30

तरुणीच्या रुग्णवाहिकेवर दगड मारून रुग्णवाहिकेची काच फोडून नुकसान केले

Today I only broke the glass tomorrow I will break your father Threatened young woman for refusing marriage | ‘आज फक्त काच फोडली, उद्या तुझ्या पप्पाना फोडेन’; लग्नास नकार दिल्याने तरुणीला धमकी

‘आज फक्त काच फोडली, उद्या तुझ्या पप्पाना फोडेन’; लग्नास नकार दिल्याने तरुणीला धमकी

पिंपरी : तरुणीचा पाठलाग करत तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला असता तरुणाने धमकी देत तिचा विनयभंग केला. तसेच रुग्णवाहिकेची काच फोडली. याप्रकरणी तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. संबंधीत तरुण हा पीडित तरुणीला एप्रिल २०२३ पासून त्रास देत होता. 

पीडित तरुणीने याप्रकरणी बुधवारी (दि. ११) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कृष्णा हनुंमत पुजारी (२७, रा. काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी या एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्या कामाला पायी जात असताना कृष्णा याने फिर्यादी तरुणीचा पाठलाग करून त्यांना अडवले. मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील का, असे म्हणत त्याने लग्नाची मागणी घातली. यावेळी फिर्यादी तरुणीने नकार दिला. या रागातून फिर्यादी तरुणीचा त्याने विनयभंग केला. तरुणीचा वेळाेवेळी पाठलाग केला. तसेच १० ऑक्टोबर रोजी फिर्यादी तरुणीच्या रुग्णवाहिकेवर दगड मारून रुग्णवाहिकेची काच फोडून नुकसान केले. आज फक्त रुग्णवाहिकेची काच फोडली आहे. उद्या तुझ्या पप्पाना फोडून काढेन, असे म्हणून त्याने तरुणाला धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Today I only broke the glass tomorrow I will break your father Threatened young woman for refusing marriage