लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 06:54 PM2020-02-07T18:54:53+5:302020-02-07T18:58:31+5:30

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Three arrested for viral pornographic video of a child | लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना अटक

लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना अटक

Next

पिंपरी : लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली.  सांगवी व चाकण या दोन्ही पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
केवा परबाराम देवासी (वय २२, रा. पिंपळे गुरव, सांगवी), किशोर भानुदास वाघमारे (वय २४, रा. दवडामळा, चाकण), अजय माताप्रसाद सागर (वय २५, रा. निघोजे, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन यांच्यामार्फत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल चाईल्ड क्राईम रेकॉर्ड ब्युरो मुंबई (एनसीसीआरपी) यांच्याकडे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्यात आले होते.

त्यानुसार, एनसीसीआरपीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे याबाबतच्या लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्याच्या ३१ टिपलाइन पाठवल्या होत्या. त्यातील १४ टिपलाइनची पिंपरी-चिंचवड सायबर सेलने तपासणी करत १२ गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. सायबर सेलकडून तांत्रिक विश्लेषण करून तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपी केवा, किशोर आणि अजय या तिघांनी सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी केवा याला सांगवी तर अन्य दोन आरोपींना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गरुड, पोलीस कर्मचारी अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिच्चेवार, मनोज राठोड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, विशाल गायकवाड, युवराज माने, कृष्णा गवळी, वैशाली बर्गे, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Three arrested for viral pornographic video of a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.