शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: पालखी सोहळ्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; देहू आणि आळंदीत मोठा फौजफाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:28 IST

देहू आणि आळंदी येथे तसेच पालखी मार्गांवर ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची आषाढी वारी सुरक्षित आणि सुशोभित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोठ्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा राहणार आहे.

देहू येथून बुधवारी (दि. १८) संत तुकाराम महाराज पालखी, तर आळंदी येथून गुरुवारी (दि. १९) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही दिवशी पालखी मार्गावरील वाहतूक, पार्किंग, गर्दी नियंत्रण, वारकऱ्यांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोठ्या फौजफाट्यासह बंदोबस्त आखला असून त्यामध्ये पोलिस सहआयुक्त, अपर आयुक्त, सहा उपायुक्त, ११ सहायक आयुक्त, ६१ निरीक्षक, १७२ उपनिरीक्षक, २६३४ अंमलदार, ८०० होमगार्ड, तीन एसआरपीएफ कंपनी, चार बीडीडीएस पथक, तीन रॅपिड कंट्रोल पथक (आसीपी), १२ स्ट्रायकिंग फोर्स यांचा समावेश असणार आहे. देहू आणि आळंदी येथे तसेच पालखी मार्गांवर ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले आहेत. त्यावरून सोहळ्यावर ‘वाॅच’ ठेवण्यात येणार आहे.

साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातील पोलिस

चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून गर्दीमध्ये साध्या वेशातील आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलिस वारीत सहभागी होणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे.

सोनसाखळी चोर, पाकीटमार रडारवर

परराज्यातील तसेच परजिल्ह्यातून सराईत सोनसाखळी चोर तसेच पाकीटमार वारीत येतात. अशा चोरट्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्यभरातील पोलिसांची त्यासाठी मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे अशा चोरट्यांची ओळख पटवणे सहज शक्य होत असून, त्यांच्यावर ‘वाॅच’ राहणार आहे.

देहू आणि आळंदी येथील पालखी सोहळ्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. डायल ११२ या हेल्पलाइनवरूनही तत्काळ पोलिस मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. -विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर