जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला डोक्यात दगड घालून संपवले, खुनातील आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 19:09 IST2017-09-27T19:04:54+5:302017-09-27T19:09:30+5:30
चिंचवड, विद्यानगर येथे २५ सप्टेंबरला इम्रान मुसा शेख (वय २५) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तीन दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.
_201707279.jpg)
जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला डोक्यात दगड घालून संपवले, खुनातील आरोपी गजाआड
पिंपरी - चिंचवड, विद्यानगर येथे २५ सप्टेंबरला इम्रान मुसा शेख (वय २५) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तीन दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातील संशयित आरोपी सूरज नवनाथ कांबळे (वय २२) याच्याकडे चौकशी केली असता, मृत्यूपुर्वी इम्रानने आपणास दस-याला जीवे मारणार अशी धमकी दिली होती, त्याच्याकडून धोका आहे हे लक्षात घेऊन साथीदारांच्या मदतीने इम्रानचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरित चार अल्पवयीन आहेत.
परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी विद्यानगर येथील खून प्रकरणातील आरोपींना पकडल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सूरज नवनाथ कांबळे (वय २२, विद्यानगर),आकाश तुकराम तरस (वय १९,रा.रामनगर),ओंकार ब्रम्हदेव राजगुरू (वय १९ बालाजीनगर, भोसरी) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर चार अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे.
याबबतची सविस्तर माहिती अशी, आरोपी झोपेत असताना त्याच्या डोक्यात दगड, सिमेंट ब्लॉक घालून त्याचा खून केल्याचे दिसून आले. परंतू खुनाचे कारण आणि आरोपी कोण असावेत? याचा शोध घेणे कठीण होते. पोलिसांनी विद्यानगर परिसरात चौकशी केली. संशयित आरोपी सूरज पोलिसांना संशयितरित्या वावरताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच भागातील मुलाशी त्याची काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती असे तो सांगू लागला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दीड महिन्यापुर्वी भावाबरोबर इम्रानचे भांडण झाले होते. २३ सप्टेंबरला चौकात येऊन इम्रानने दसºयाला तुला ठार मारतो असे मला धमकावले होते. त्याच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे, हे लक्षात घेऊन साथीदारांच्या मदतीने इम्रानला मारण्याचा कट रचला. ओंकार ला मदतीला घेतले. पेस्ट कंट्रोलचे काम करीत असल्याने गुंगी आणणाºया औषधांबद्दल माहिती होती. दारू पिऊन झापेलेल्या इम्रानच्या तोंंडावर गुंगी आणणारी किटकनाशक पावडर टाकली. नंतर अन्य साथीदारांच्या मदतीने त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले. अशी कबुली आरोपीने दिली आहे.